logo

साखरखेर्डा येथे ईद-उल-फित्र ईद मोठया उत्साहात साजरी. साखरखेर्डा येथे ईद-उल-फित्र ईद मोठया उत्साहात साजरी. हिन्दू - मुस्लिम बांधवांनी एकमेकांशी गळाभेट घेऊन दिला माणूसकीचा परिचय

Aima news जुबेर शाह बुलढाणा

साखरखेर्डा.दि ११ एप्रिल २०२४ गुरुवार रोजी साखरखेर्डा येथिल ईदगाह प्रांगणात येथे मुस्लिम बांधवातर्फे मोठया प्रमाणात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली..जगभरातील मुस्लिम लोक ईद-उल-फित्र साजरा करतात, जो सर्वात महत्वाचा सण आहे.मात्र राज्यासह देशात सर्व मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात ईदचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी मुस्लिम बांधवांना एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली.हा सण रमजानच्या शेवटी साजरा केला जातो. यामध्ये गरिबांना अन्न देणे आणि भिक्षा वाटणे. ईद-उल-फित्र साजरी करून, उपवास आणि प्रार्थना कालावधी संपतो. चंद्र पाहिल्यानंतर लोक नवीन कपडे घालतात आणि आपल्या प्रियजनांना भेटतात.गेल्या महीनाभर मुस्लिम बांधवांनी सतत कडक उन्हात उपवास ठेवले.सर्व हिन्दू मुस्लिम बांधवासाठी एकता अखंडता प्रेम संपूर्ण देशात सुखशांतीसाठी अल्लाहकड़े प्रार्थना केली.यामध्ये सखारखेर्डा येथिल सर्व समाजबांधवांनी सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने माणूसकीचा परिचय देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. साखरखेर्डा सह परिसातील गोरेगाव पांग्री कुटे, शिंदी शेंदुर्जन आदी खेड्यातून उपस्थित होते. हाफीज मैफुज आलम यावेळी माजी सरपंच दाऊद कुरेशी, उपसरपंच सैय्यद रफिक aimim तालुका उपाध्यक्ष युनूस शाह शहेर अध्यक्ष असलम शाह गोरेगाव उन दिलशान खान पठाण, सैय्यद सर, खुदायार खा पठाण पांग्रि काटे येथील अमान खा यांची प्रमुख उपस्थिती होती.साखरखेर्डा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री सोपनिल नाईक, नितीन राजे जाधव, व त्यांच्या सर्व टीम यांनी कडक चोक बंदोबस्त ठेऊन आपल्या कर्मचाऱ्यांसोबत सर्व मुस्लिम बांधवाना पुष्पगुच्छ देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.रायपुरात हिन्दू मुस्लिम बांधवांनी एकामेकांशी गळाभेट घेऊन एकता, बंधुता व अखंडता याचा संदेश मिळवून दिला. अश्या प्रकारे ईद-उल-फित्र ईद मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

51
7049 views